शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, मंगरूळ, नागणसूर, सलगर, वागदरी, चपळगाव जिल्हा परिषद भाग तसेच अक्कलकोट मैंदर्गी व दुधनी शहरातील अनेक भागातील अतिवृष्टी, पूर परिस्थितीचे थेट परीक्षण केले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे भयंकर नुकसान झाल्याचे पाहून त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याच्या प्रवाहामुळे तीन तीन फूट माती वाहून गेली.