उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते रामटेक यांनी मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनसर - माऊली मार्गावर नाकाबंदी करून सोमवार दिनांक एक सप्टेंबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हवेत पशूंची वाहतूक करणारा आयशर वाहन ला पकडून त्यात कोंबलेल्या 11 म्हशी ताब्यात घेतल्या. आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.