धुळे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेला चेतन पाटील (वय ३०, रा. भोकर) हा गुन्हेगार शहरात विनापरवाना फिरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती गोंदूर रोडवरील सौभाग्य लॉन्सजवळ सापडला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली.