उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे शासकीय गोडाऊनची उभारणी होत असून मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, कामाचा दर्जा पहिला तर सिमेंट बरोबर नाही,विटा देखील कमी दर्जाच्या वापरल्या जात आहेत, शासनाचा पैसा अशा पध्दतीने वाया जात असेल तर आम्ही सहन करणार नाही, निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम व्यवस्थित सुरू करा अन्यथा गुत्तेदार ज्या कामगारा मार्फत काम सुरू करेल त्यांना आम्ही काम करू देणार नाही अशा इशारा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांनी माध्यमासमोर बोलताना दिलाय.