नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी महापालिकेकडून "WhatsApp ChatBot" ही नवी डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवा, तक्रार निवारण, करसंबंधी माहिती, तसेच इतर महत्वाच्या शासकीय सेवा घरबसल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि कागदोपत्री प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल.