सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथे समाजमाध्यमावर मैत्रिणीचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या संशयावरून एका २५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तिघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे