जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी फातीमा नगर येथे दोन लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.