४० वर्षांची मक्तेदारी संपली; संगमनेरकरांनी घडवला चमत्कार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या आज दुपारी तीन वाजता आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “संगमनेरकरांनी चमत्कार घडवला आहे. ४० वर्षांची मक्तेदारी उलटवून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावला.” त्यांनी स्पष्ट केले की, “अमोल खताळ यांनी मातब्बर उमेदवाराचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरले असले तरी खरे जायंट किलर माझे भाऊ, बहिणी आणि शेतकरीच आहेत.”