अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा संगमनेर – पुणे व नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय आरोपीस न्यायालयाने दहा वर्षांचा सक्तमजुरी कारावास व सात हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल आज दुपारी एक वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी दिला.