जालना शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर अखेर कारवाईची गाडी वेगाने पुढे सरकली असून, राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तडजोडी झाल्या आहेत. शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे पार पडलेल्या तिसर्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये महानगरपालिकेकडील 372 अनधिकृत नळ कनेक्शन धारकांनी तडजोड करून त्यांचे कनेक्शन नियमित केले. या कारवाईतून महानगरपालिकेने तब्बल रु. 27 लाख 15 हजार 600 रुपये रकमेची वसुली केली आहे.