महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आलेल्या महसूल सप्ताह 2025 चा समारोप समारंभ दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी शहादा तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी भूषवले होते. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, विभागीय अधिकारी, महसूल कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.