दि.16 ऑगस्टच्या सायं.7 वाजेच्या सुमारास तिरोडा चंद्रभागा गोंदिया हायवेवर मोटरसायकल स्लीप होऊन खाली पडून गंभीर जखमी होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.रितेश राणे असे मृतकाचे नाव आहे. मृतक मो.सा.क्र.एमएच 35 क्यू 7387 ने खैरबोडी कडून भुराटोला येथे आपल्या गावी जात असताना कुणीतरी मोटरसायकल समोर आल्याने मृतकाने जोरात ब्रेक मारले असता मोटरसायकल स्लीप होऊन खाली पडून गंभीर जखमी झाला. मृतक नागपूर येथे 29 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजता मरण पावल्याने दि.11 सप्टें. 4 वा. मर्ग दाखल करण्यात आले आहे.