अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्याबरोबरच सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना अर्पण करण्यात आली.