घाटंजी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित फवारणी जनजागृती होत या महत्त्वपूर्ण अभियानास सुरुवात झाली.पंचायत समिती व तालुका कृषी विभाग तसेच सिंगेंटा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभियानाचा शुभारंभ गजानन पिल्लेवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांच्या हस्ते करण्यात आला.त्यांनी हिरवी झेंडी दाखवत मार्गस्थ केला. या रथाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करताना..