पुणे-सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या एका कंटेनरमधून 18 हजार रुपये किमतीचे तब्बल 200 लिटर डीझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अमोल हनुमंतराव निगडे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.