तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वग -विरखंडी शिवारात धावत्या स्कार्पिओ गाडीला आग लागून स्कार्पिओ जळून खाक झाल्याची घटना घडली. ऋषीपंचमी निमित्ताने 8 महिला स्कार्पिओ गाडीने माहुरंगड येथे जात असताना वग-विरखंडी शिवारात धावत्या स्कार्पिओ गाडीला अचानक आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येतात ताबडतोब गाडी थांबवून महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाश्यांच्या कपड्याच्या ब्याग व मोबाईल आणि स्कर्पिओ जळून खाक झाली.