बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी डॉ ज्योतीताई खेडेकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी खेडेकर परिवाराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे आदी उपस्थित होते.