पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. पालघर जिल्ह्यातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून रेल्वे समस्यांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पालघर रेल्वे स्थानकात बांद्रा सुरत इंटरसिटी, बांद्रा गाजीपुर एक्सप्रेस, जोधपुर हडपसर एक्सप्रेस, भावनगर एक्सप्रेस या गाड्यांना थांबे देण्यात यावे. बोईसर, डहाणू रोड या रेल्वे स्थानकातील गाड्यांच्या थांब्यांबाबत व मागण्यांबाबत यावेळी खासदारांनी निवेदन दिले.