कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील श्री साई भक्तांच्या वतीने आखाडा बाळापुर ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेस आ .बाळापूर शहरातील श्री साई मंदिरापासून आज दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ झाला असून ही पदयात्रा साईबाबांची प्रतिमा,पादुका असलेली पालखी घेऊन हिंगोली,औंढा नागनाथ, जिंतूर ,जालना ,औरंगाबाद मार्गे शिर्डी कडे 130 भाविक भक्तांसह रवाना झाली आहे .