भुसावळ शहर व तालुक्यातील गावांमध्ये स्मार्ट मीटर लावू नका अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे. याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती दि. २८ ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटातर्फे देण्यात आली.