शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास पाकिस्तानसोबत आशिया कप सामना खेळण्यावर बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले की, दहशत पसरवणाऱ्या पाकिस्तानसोबत खेळण्यास बीसीसीआय पैशासाठी उत्सुक आहे का? जर खरा भाजप सत्तेत असता तर हे घडले नसते, असेही ते म्हणाले.