कंडारी येथे आमदार हिकमत दादा उढाण व सौ.मायाताई उढाण यांनी बैलपोळा सणानिमित्त बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. शेतकऱ्यांचा खरा आधार असणाऱ्या बैलांचे महत्त्व अधोरेखित करत हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार हिकमत दादा उढाण म्हणाले, "शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपला देश समृद्ध आहे. बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती असून त्याचे पूजन करून आपण शेतकऱ्याच्या कष्टाला मान देतो."