काटोल पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुनील नगर येथून दुचाकीने दारूची तस्करी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून विदेशी दारू आणि दुचाकी असा एकुण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.