म.प्र.काँ.कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी चिखली येथे “मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी” या मॅरेथॉनचे आयोजन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. या मॅरेथॉन प्रसंगी माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, व इतर १३ काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थांच्या सहाय्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका आहे.चिखली पोलीस स्टेशन येथे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.