करळगाव घाटात एका दुचाकीला समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकप वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे एका 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 30 ऑगस्टला उघडकीस आली.या अपघातात दुचाकी वर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनीष ईडपाते असे अपघातातील मृतकाचे नाव असून संजोग वासनिक असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे.