परवानाधारक रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे एका व्यक्तीच्या स्वतःच्या पायात गोळी लागली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी कुरळी गावात घडली.पोलीस हवालदार सदाशिव नाईकनवरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर गुलाब सोनवणे (३५, सोनवणे वस्ती, कुरळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.