ऐतवडे बुद्रुक येथे बाल गणेश मंडळाचा पारंपारिक वाद्यातून गणेश विसर्जन सोहळा; महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन सोहळा पारंपारिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडला. 2010 साली स्थापन झालेल्या या मंडळाने सामाजिक उपक्रमांसह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्याने पुढाकार घेतला आहे. यंदाही गणरायाच्या आगमनानंतर दररोज भजन-कीर्तन, वृक्षारोपण, महाप्रसादाचे आयोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.