अंबड तालुक्यातील आपेगाव येथील श्री विज्ञानेश्वर मंदिर देवस्थान येथे श्री संत भानुनंद महाराज यांच्या ३६व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हभप श्री भगवान महाराज परभणीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. तसेच ५६ भोग अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. 👉 पुण्यतिथी सोहळ्यामुळे श्री विज्ञानेश्वर मंदिर परिसर भक्तिरसात रंगून गेला होता.