मनमाड शहरातील बुदलवाडी येथे पोळा सणानिमित्त सर्जा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती गावाच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिराजवळ सर्जा राजाला मानवंदना देण्यासाठी शेतकरी वर्ग घेऊन आला होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावकरी महिला व लहान मुले उपस्थित होते