Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
आज दिनांक 8 ऑक्टोंबर संध्याकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थ नगर येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे स्तंभ पूजन मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी “लढणार, जिंकणार, भगवा पुन्हा फडकणार” या घोषवाक्याद्वारे शिवसैनिकांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.