चिचोली येथील ग्रापं च्या वतीने सामान्य फंडातील ५ टक्के निधी अंतर्गत दिव्यांगांना संसार उपयोगी साहित्य वाटपाचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यानुसार ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास चिचोली येथील ४६ दिव्यांगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. हे वाटप चिचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. संसार उपयोगी कोणत्या साहित्याचे वाटप करण्यात यावे यासाठी ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव मांडण्यात आला. त्यात ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.