“भास्कर खेमनर यांच्यावर खोटा गुन्हा; अंभोरेकर संतप्त – राजकीय सूडबुद्धीला ग्रामस्थांचा जाहीर निषेध” लोकशाहीत नागरिकांना आपली व्यथा लोकप्रतिनिधींना सांगण्याचा हक्क असतो. मात्र हाच हक्क वापरल्याबद्दल भास्कर खेमनर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रकार राजकीय दबावाखाली पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.