आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांकडे बोट; जरांगेच्या आंदोलनावर विखेंची टीका मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे त्यांचे सूतोवाच असल्याचा टोला लगावताना विखेंनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे ज्यांच्या रिमोट कंट्रोलवर होते त्यामुळे त्यांना याची समजच नाही आली, असे विखे म्हणाले.