भावकितील मुलीला शाळेतून घरी सोडवल्याचा राग मनात धरून एकावर पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना पुण्याच्या वडगाव मावळमध्ये घडली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.अक्षय एकनाथ मोहितेवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने तो या घटनेत थोडक्यात बचावला आहे.