येळगांव येथील शेतकरीची बुडीत क्षेत्रातील जमीनिवर बुलढाणा नगर परिषदेकडून सौंदर्यकरणाचे काम होत असून यात आपण करत असलेली शेती जाणार म्हणून 40 वर्षीय शेतकरी बुलढाणा येथील बीएसएनएलच्या जवळपास 350 फूट उंच टावरवर आज 7 सप्टेंबर रोजी दुपारी चढल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.अखेर पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानंतर त्याला टॉवर वरून खाली उतरावण्यास यश आले आहे.