कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी पासून सोलापूर ग्रामीण दौ-यावर असून त्यांनी मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील गणेश उत्सव, ईद ए- मिलाद व आगामी कायदा व सुव्यवस्था प्रश्न याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस घटकांचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील गणेश मंडळ, एक गाव एक गणपती तसेच No DJ ....No Dolby या संदर्भात पोलीस प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधक कारवाई, बंदोबस्त आराखडा याबाबत माहिती घेवून महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.