हद्दपारीचा आदेश झुगारून शहरात वास्तव्य करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिपेठ पोलिसांनी बुधवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. तेजस दिलीप सोनवणे याला उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांनी, तर सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे याला पोलीस अधीक्षक कार्यालयाने एका विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.