शिरुर शहरातील सरदार पेठेतील गजबजलेल्या भागात आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या नामांकित सराफ दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.