राहुरी रेल्वे स्टेशन येथे नव्याने थांबा मिळालेल्या मुंबई-शिर्डी साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीचे ग्रामस्थांच्या वतीने रेल्वेचे चालक, वरिष्ठ अधिकारी व रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांचा सन्मान करून जोरदार स्वागत केले आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. शिर्डी मुंबई साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीला थांबा मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.