आज दि सहा स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की पुणे येथून कन्नड शहर पोलिसांनी माधव सुंदरम गोगला यास अटक केली. तीन महिन्यांपूर्वी हिवरखेडा नाक्यावरील एसबीआय बँकेसमोर दुचाकीच्या डिकीत ठेवलेले दोन लाख रुपये चोरी गेले होते. वासडी येथील पोस्ट ऑफिस कर्मचारी संजय यादव पंडित यांनी २९ मे रोजी बँकेमधून पैसे काढले आणि दुचाकीच्या डिकीत ठेवले. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून पिशवी उचलली आणि फरार झाला होता.