आगामी काळातील सण, उत्सव शांततेत पार पडावे. व शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंचायत समितीच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात शांतता समितीची सभा पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, नगराध्यक्षा सुलभा पिपरे, गट विकास अधिकारी नमिता बांगर, पोंभूर्णा ठाणेदार राजकमल वाघमारे, उमरी पोतदार ठाणेदार ठेंगणे, नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके, दिपाली आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.