दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यक्षेत्रातील निंबर्गी येथील मंडळ अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांच्याकडे दिल्याची माहिती निंबर्गी येथील शेतकरी लक्ष्मण सुतार यांनी मंगळवारी सायं 6 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.