रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करून जयगड पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून तब्बल 95 टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. केदारवाडी-गणपतीपुळे (ता.जि. रत्नागिरी) येथे श्री. तवरेंद्र शांताराम गोसावी यांच्या राहत्या घरात 26 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत चोरी झाली होती. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि लॉकर उचकटून 2 लाख 36 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.