सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सध्या आमदार नसतानाही त्यांच्या गाडीवर “आमदार” असा लोगो लावल्याचे समोर आले आहे. पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या गाडीवर हा लोगो दिसून आला. याबाबतचा व्हिडिओ आज मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही गाडीवर आमदारकीचा लोगो लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.