सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी काठावरील हजारो हेक्टर जमिनीवर मिरची व कापसाचे उत्पादन शेतकरी घेतात. दरवर्षी पुराचा फटका नदीकाठावरील पिकांना बसतो, तसेच नदीकाठालगतची शेती दरवर्षी खरडते व खचते. भविष्यात शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र घटण्याचा धोका आहे.