पंढरपूर येथे उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तयार झाली आहे. दरम्यान, आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता उजनी धरणातून एक लाख 25 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. सध्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.