मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आदर्श तेली समाजसेवा समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी कमल हटवार, उमेंद्र भेलावे, माधव भेलावे, डॉ.माधुरी नासरे , मुकेश पाटील, कैलास भेलावे, संतोष भेलावे, वाय.डी.धावडे, बलीराम डोरले, अशोक पडोले, सुनील भोंगाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.