सकाळच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारात काही पाळीव जनावरे चराई करण्यासाठी घेऊन गेला होता. सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाचा विजांच्या गडगडाटात वीज पडल्याने पशुपालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मानेगाव बाजार येथील शेत शिवारात घडली. बबन नत्थू भदाडे (५३) रा मानेगाव बाजार असे घटनेतील मृतक पशुपालकाचे नाव आहे.