“एकच मिशन एसटी आरक्षण… उठ बंजारा जागा हो,एसटी आरक्षणाचा धागा हो…” अशा घोषणांनी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी अंदाजे 12 ;30 वाजता यवतमाळ शहर दणाणून गेले.यवतमाळ जिल्ह्यातील सखल बंजारा बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत स्थानिक महानायक वसंतराव नाईक चौकात जमले. “आमच्या समाजाचा ऐतिहासिक हक्क असलेले आरक्षण तातडीने मिळाले पाहिजे.सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी.समाज बांधव आता एकदिलाने लढ्यासाठी सज्ज आहेत.”असे आंदोलकांनी सांगितले.