काही दिवसांपूर्वी जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्या शिवाजी कुळ्ये (50, रा.तरवळ कुळ्येवाडी, रत्नागिरी) या प्रौढाला धडक देत अपघात केल्याप्रकरणातील दुचाकी ही चोरीची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातातील प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातातील दुचाकी चालक श्रीराज प्रसाद सावंत (23, रा.मांजरे देसाईवाडी, संगमेश्वर) याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी व दुचाकी चोरी असे दोन्ही गुन्हे ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.